jayaprakash narayan coop spinning mill election result saam tv
महाराष्ट्र

Shahada : जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी निवडणुकीत 'लोकशाही'चा दणदणीत विजय, शेतकरी पॅनलच्या हाती भाेपळा

सूतगिरणीला सावरण्यासाठी लोकशाही पॅनल प्रयत्न करेल असा विश्वास लोकशाही पॅनलचे नेते दीपक पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News :

शहादा तालुक्यातील राजकारणात महत्त्वाचे असलेल्या जयप्रकाश नारायण सहकारी सुतगिरणीचा पंचवार्षिक निवडणूक मोठ्या चुरशीची झाली होती. या निवडणूकीचा निकाल (Jayaprakash Narayan Coop Spinning Mill Election Result) जाहीर झाला. या निवडणुकीत भाजप नेते दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही पॅनलने आपली सत्ता कायम ठेवली आहे. (Maharashtra News)

युवा नेते अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनलने लोकशाही पॅनलला या निवडणुकीत मोठा आव्हान उभं केलं होतं. या निवडणुकीत लोकशाही पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी तसेच लोकशाही पॅनलच्या कार्यकर्त्यांनी शहादा शहरात एकच जल्लोष केला आहे.

सहकार क्षेत्रात असलेल्या जयप्रकाश नारायण सूतगिरणीची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे. या परिस्थितीतून सूतगिरणीला सावरण्यासाठी लोकशाही पॅनल प्रयत्न करेल असा विश्वास लोकशाही पॅनलचे नेते दीपक पाटील यांनी व्यक्त केला. दुसरीकडे मतदारांनी आपल्याला भरभरून प्रेम दिला असून मतदारांचा कौल मान्य असल्याची प्रतिक्रिया शेतकरी पॅनलचे नेते अभिजीत पाटील यांनी व्यक्त केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT