Devendra Fadnavis Saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis:... अन् तेव्हापासून डॉ. आंबेडकर जयंती साजरी केली जाते; जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून देवेंद्र फडणवीसांचे आभार

Devendra Fadnavis on japan tour: जपानच्या कोयासन विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

Vishal Gangurde

Devendra Fadnavis Latest News:

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र आणि जपानच्या मैत्रीसंबंधांच्या दृष्टीने हा महत्वाचा दौरा मानला जात आहे. याचदरम्यान, जपानच्या कोयासन विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. (Latest Marathi News)

जपानच्या कोयासन विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा महाराष्ट्र सरकारकडून भेट देण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पूर्णाकृती पुतळा भेट देण्यात आला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील इतर मंत्री उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दिल्याबद्दल जपानच्या कोयासन विद्यापीठाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्र सरकारकडून कोयासन विद्यापीठाला भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे. तसेच त्यासाठी एक पत्र (‘लेटर ऑफ अ‍ॅप्रिसिएशन’ ) दिले आहे.

कोयासन विद्यापीठाचे अध्यक्ष रे. सोईडा र्युषो यांनी हे पत्र दिले आहे. ते या पत्रात म्हणाले, 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कोयासन विद्यापीठाला दिला होता. तेव्हापासून दरवर्षी विद्यापीठात डॉ. आंबेडकर जयंती साजरी केली जाते. याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत. भारत-जपान संबंध असेच वृद्धिंगत होत राहतील, अशा सदिच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केल्या आहेत'.

देवेंद्र फडणवीसांचा जपान दौरा कसा आहे?

जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प, गुंतवणुकीला चालना देण्यासाठी हा दौरा महत्वपूर्ण असणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांचीही भेट घेणार आहेत.

जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदार तसेच जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांचीही भेट घेणार आहेत. जायकाने राज्यातील अनेक प्रकल्पांना अर्थसहाय्य केले आहे

जपानमधील बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो ऑपरेशन्सला सुद्धा फडणवीस भेट देणार आहेत. याआधी देवेंद्र फडणवीस यांनी 2015 मध्ये जपान दौरा केला होता. जायकाने विविध प्रकल्पांसाठी महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांना वित्तपुरवठा केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT