police Saam tv
महाराष्ट्र

Viral Video: शेजाऱ्यांमध्ये तुफान राडा, २ गटात दगडफेक; वाहनांच्या काचाही फोडल्या, VIDEO व्हायरल

Viral video of Jalna violence: शेजारच्यांमध्ये किरकोळ वादातून हाणामारी झाली. नंतर दगडफेकही झाली. या प्रकरणी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.

Bhagyashree Kamble

शेजारच्यांमध्ये किरकोळ वादातून हाणामारी झाली. नंतर दगडफेकही झाली. दगडफेक झाल्यानंतर दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ही घटना जालना शहरातील गांधीनगर भागात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंची तक्रार घेऊन पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

जालना शहरातील गांधीनगर भागात रात्रीच्या सुमारास दोन गटात वाद झाला. शेजारच्यांमध्ये हा वाद झाल्याची माहिती आहे. लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. हाणामारी झाल्यानंतर दगडफेकही करण्यात आली.

दगडफेकीत काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. या दगडफेकीत वाहनांची तोडफोड देखील झाली आहे. यामुळे वाहनांची प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान हा दोन शेजारी शेजारी राहणाऱ्या कुटुंबाचा वाद असून, या भांडणात कोणतेही जातीय कारण नाही.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंची तक्रार घेऊन पोलिस पुढील कारवाई करणार असून, पोलिस पुढील कारवाई करणार असल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात शातंता पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT