Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: तलावात मासेमारी करायला मित्रांसोबत गेला; अंदाज न आल्‍याने तरुण बेपत्ता

Youth Missing While Fishing : तलावात मासेमारी करायला मित्रांसोबत गेला; अंदाज न आल्‍याने तरुण बेपत्ता

लक्ष्मण सोळुंके

जालना : मासेमारी करण्यासाठी तलावात गेलेला तरुण बेपत्ता झाल्याची घटना मंठा तालुक्यातील तळतोंडी शिवारात (Jalna News) असलेल्या तलावात घडलीय. सचिन हरिभाऊ राक्षे असे या तरुणाने नाव आहे. (Live Marathi News)

सचिन राक्षे हा आपल्या मित्रांसह तळतोंडी शिवारातील असलेल्या तलावात मासेमारी करण्यासाठी गेला होता. मासेमारी करीत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. यामुळे तो पाण्यात बुडाला असल्याची माहिती त्याच्या सोबत असलेल्या तरुणांनी गावकऱ्यांना दिली. यानंतर गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयन्त केला. मात्र त्यांना त्यात यश आल नाही.

तलावातील गाळात फसल्‍याचा अंदाज

यानंतर ग्रामस्थांनी घटनेची माहिती प्रशासनाला कळविताच प्रशासनच्या वतीने घटनास्थळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. बुडालेल्या तरुणाचा शोध पथकाकडून घेतला जात आहे. तलावात गाळ असल्याने हा तरुण पाण्याखाली गाळात फसला असल्याचा अंदाज या पथकाकडून वर्तविला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT