Jalna Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Jalna Water Crisis : जालन्यात पाणीटंचाईच्या झळा; दोन मध्यम प्रकल्प कोरडेठाक, बदनापूर तालुक्यात भीषण स्थिती

Jalna News : राज्यातील अनेक भागात मार्च महिन्याच्या मध्यंतरीच पाणी टंचाईच्या झळा जाणविण्यास सुरवात झाली होती. त्यानुसार जालना जिल्ह्यात देखील आता टंचाईच्या झळा जाणवायला सुरवात झाली आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: जालना जिल्ह्यात देखील आतापासून पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसण्यास सुरवात झाली आहे. यात बदनापूर तालुक्यात अधिक भीषणता जाणवू लागली आहे. कारण जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्प हे कोरडेठाक पडले आहेत. तर ७ मध्यम आणि ५७ लघुप्रकल्पात केवळ २८ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पाणी समस्येची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. 

राज्यातील अनेक भागात मार्च महिन्याच्या मध्यंतरीच पाणी टंचाईच्या झळा जाणविण्यास सुरवात झाली होती. त्यानुसार जालना जिल्ह्यात देखील आता टंचाईच्या झळा जाणवायला सुरवात झाली आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडका वाढत असल्याने पाण्याच बाष्पीभवन होऊन पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील ६४ मध्यम प्रकल्पांपैकी दोन मध्यम प्रकल्प कोरडे ठाक पडले असून ७ मध्यम आणि ५७ लघु प्रकल्पात केवळ २८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. 

२५ हजार नागरिकांना ट्रॅकरचा आधार 

जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी आणि जालना तालुक्यातील पाणीपातळी खालवल्यामुळे शेतकऱ्यांसमोर फळबागा टिकवण्याचे मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. तर अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बदनापूर तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईची समस्या अधिक गडद असून २५ हजार नागरिकांना सद्यस्थितीला प्रशासनाकडून १० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. 

पिरकल्याण प्रकल्प पडला कोरडा 

दरम्यान जालना तालुक्यातील पीरकल्याण मध्यम प्रकल्प कोरडा ठाक पडल्यामुळे आजूबाजूच्या १० ते १२ गावांना देखील येणाऱ्या काळात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहे. तर बहुतांश प्रकल्पातील पाणी पातळीत देखील झपाट्याने घट होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईच्या समस्या जमविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT