Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Heavy Rain : गरिबीचा संसार, मोलमजुरी करून गाडा हाकतोय, पावसानं माती केली; पावसामुळे सडलेला कांदा पाहून शेतकरी महिलेचे अश्रू अनावर

Jalna News : जालन्यातील वखारी येथील शेतकरी श्रीराम घुले या शेतकऱ्याचा जवळपास ३० क्विंटल कांदा शेतातच सडला आहे. या शेतकऱ्याने अर्धा एकरवर कांद्याची लागवड केली होती. कांद्याचे भरघोस उत्पन्नही झालं

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 

जालना : शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे अवकाळी पावसामुळे आतोनात नुकसान केले आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा सडला, यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. शेतात काढणी करून ठेवलेला कांदा पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहत आहेत. गरिबीचा संसार, फार वावर पण नाही, मोलमजुरी करून गाडा हाकतोय; या आता या पावसानं माती केली. नुकसान भरपाई द्या; असे म्हणत महिला शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. 

जालना जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सतत वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील फळबागातदारांसह कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. यात जालन्यातील वखारी येथील शेतकरी श्रीराम घुले या शेतकऱ्याचा जवळपास ३० क्विंटल कांदा शेतातच सडला आहे. या शेतकऱ्याने अर्धा एकरवर कांद्याची लागवड केली होती. कांद्याचे भरघोस उत्पन्नही झालं, हा कांदा विक्रीसाठी मार्केटमध्ये नेण्यात येणार होता.  

शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका 

मागील महिनाभरापासून अवकाळी पाऊस सुरु आहे. परिणामी शेतात काढून ठेवलेला कांदा आता पावसामुळे सडला आहे. अक्षरशः या कांद्याचे पाणी झाले असून यात अळ्या देखील पडल्या आहेत. अवकाळी पावसामुळे या शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. हा सडलेला कांदा पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे. 

पावसाने कांद्याचा उभ्या पिकाचा शेतातच चिखल

सिन्नर (नाशिक) : नाशिक जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस सातत्याने पडत आहे. या पावसामुळे कांद्याचा उभ्या पिकांचा शेतातच चिखल झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे प्रचंड नुकसान होऊन देखील अद्याप पंचनामे न झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. दरम्यान अधिकारी बांधावर फिरकले नसल्याने शेतकऱ्याला संताप अनावर झाला आहे. कांदा शेतातच सडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याचे जवळपास ८ ते ९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT