Jalna News Saam Tv
महाराष्ट्र

Jalna News: जालन्यात मराठा समाज आक्रमक, रावसाहेब दानवेंसह नारायण कुचेंना थेट माघारी फिरवलं, नेमकं काय घडलं?

Rohini Gudaghe

लक्ष्मण सोळुंके

Maharashtra Politics News

मराठा आरक्षणासाठी गावागावात आंदोलने झाली आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याचं आपण पाहिलं आहे. आता जालना जिल्ह्यातील एका गावात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) आणि आमदार नारायण कुचे (MLA Narayan Kuche) यांना मराठा समाजाकडून दारात येण्यास बंदी केली गेली आहे.

(Latest Political News)

बदनापूर तालुक्यातील (Jalna) बुटेगावच्या मराठा समजाकडून जोरदार घोषणाबाजी करत मंत्र्यांसह आमदारांना गावात येण्यास मनाई केली गेली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे बदनापूर तालुक्यातील बुटेगाव येथील विकास कामांच्या उद्घाटनसाठी आले होते. तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना गावात येण्यास विरोध (Raosaheb Danve And Narayan Kuche Entry) केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंत्रीमहोदयांना गावात नो एन्ट्री

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे यांना विरोध करत, आमच्या दारात यायचं नाही म्हणत गावकऱ्यांनी त्यांना गावात येण्यास मनाई केली आहे. ही घटना काल सायंकाळी सात वाजल्याच्या सुमारास घडली (Maharashtra Politics) आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे विविध विकास कामाच्या भूमीपूजनासाठी बुटेगावात (Butegaon) गेले होते. यावेळी मराठा समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी केली गेली. आमच्या दारात येण्यास विरोध आहे, असे म्हणत त्यांना वाहनातून खाली उतरू दिले नाही. वाहनाच्या दारातून त्यांना परत जाण्यास भाग पाडले.

मराठा समाज आक्रमक

यावेळी मराठा समाज (Maratha Aarkshan) चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. चालकासह केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे यांच्या स्वयंसहायकाची चांगलीच तारांबळ झाली होती.

मंत्री महोदयांसह आमदार कुचे यांना मराठा आंदोलक आक्रमक झाल्यामुळं गावातून काढता पाय घेण्याची वेळ आली होती. मराठा आरक्षणासाठी समाज आता पुन्हा गावागावात आक्रमक होताना दिसत आहे. गावबंदीनंतर आता मराठा समाजाकडून (Maratha Samaj) दारबंदी करायला सुरवात झाल्याचं दिसतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखीन एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT