Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna : कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

Jalna News : घरी असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास हे दोघेजण जवळच असलेल्या मोती तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहण्यासाठी तलावात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: जालन्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. शहरातील मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी घरी समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान दोन तासांच्या प्रयत्नानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. 

जालना शहरातील शेरसवार नगर परिसरात वास्तव्यास असलेले जुनेद सय्यद आसेफ (वय १९) आणि अयान सय्यद आसेफ (वय १५) असे घटनेत मृत झालेल्या भावांचे नाव आहे. दोन्ही भाऊ घरी असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास हे दोघेजण जवळच असलेल्या मोती तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहण्यासाठी तलावात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या हि घटना लक्षात आली. 

अग्निशमन दलाने काढले मृतदेह 

घटनेची माहिती जालना पालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. यानंतर अग्निशामक दलाचे पथक याठिकाणी दाखल झाले. दोन तास परिश्रम घेऊन दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जालना सामान्य रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. दरम्यान या दोन भावांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

कुटुंबीयांचा आक्रोश 
मोती तलावामध्ये बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दोघा भावांच्या मृत्यूमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच जुनेद आणि अयाज या दोन्ही भावांच्या आई- वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाहून कुटुंबातील सदस्यांनी एकच आक्रोश केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT