Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: दारू पिऊन रुग्णांवर उपचार; बोगस डॉक्‍टराचा पर्दाफाश

दारू पिऊन रुग्णांवर उपचार; बोगस डॉक्‍टराचा पर्दाफाश

लक्ष्मण सोळुंके

जालना : मागच्‍या नऊ वर्षांपासून प्रॅक्टिस करणाऱ्या बोगस डॉक्टरचा मौजपुरी येथे पर्दाफाश झाला आहे. बोगस डॉक्टरच्या (Bogus Doctor) दवाखान्यावर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाचा छापा टाकला असून दारू पिऊन रुग्णांवर करत होता. तसेच दवाखान्यात आढळल्या घातक औषधी आढळली असून मौजपुरी पोलीस (Police) ठाण्यात बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करत आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. (Live Marathi News)

जिल्ह्यातील (Jalna News) बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक मौजपुरी गावात पोहचताच, या बोगस डॉक्टरने पळ काढला. यावेळी त्याला ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात आले. या डॉक्टरच्या (Doctor) दवाखान्यात पथकाने छापा मारून वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली असता त्यानं निसर्गोपचाराचे प्रमाणपत्र दाखवले. रिपोन सिकदर असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे.

दवाखान्‍यात आढळली घातक औषधी

जालन्यातील मौजपुरीमध्ये एका बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पथकाने छापा टाकत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश केला आहे. गेल्या 9 वर्षांपासून हा बोगस डॉक्टर रुग्णांना सेवा देण्याच्या नावाखाली दारू पिऊन रुग्णांवर उपचार करत होता. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने या बोगस डॉक्टरच्या दवाखान्यात छापा मारला. त्यावेळी दवाखान्यात विविध प्रकारच्या घातक औषधी आणि इंजेक्शन आढळून आली. शिवाय औषधांच्या एका खोक्यात दारूची बाटली देखील आढळून आली. तालुका आरोग्य विभागाच्या पथकानं ही घातक औषधी जप्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Things You Should Never Give to Others: या 5 गोष्टी चुकूनही दुसऱ्याला देऊ नका

Maharashtra News Live Update: पवई IIT च्या गेटवर युवक काँग्रेसकडून आंदोलन

5 Gram Gold Mangalsutra: 5 ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी सुंदर मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाइन्स

मुंबईच्या ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले अन् ताटात काय दिसलं? प्रसिद्ध डॉक्टरांचा थेट तुकाराम मुंढेंकडे संताप

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT