Raosaheb Danve Saam tv
महाराष्ट्र

Raosaheb Danve : ठाकरेंची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही; माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

Jalna News : एक काळ असा होता शिवसेनेचे ३ आमदार आणि भाजपचा मी एकटा आमदार होतो. मात्र आज काळ असा आहे की भाजपचे ३ आमदार तर शिवसेनेचे २ आमदार आहेत. शिवाय राष्ट्रवादीचा (शरद पवार) कोणी आहे का

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: काँग्रेस आणि राष्ट्रवादीची इतकी ताकद होती. परंतु त्यांच्या वागणे, व्यवहारामुळे आणि त्यांच्या विचारापासून दूर गेल्यामुळे काँग्रेस जवळपास आता संपुष्टात आली आहे. तर राष्ट्रवादी देखील संपलेली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना देखील पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही; असं विधान माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी आज जालना येथे केले. 

जालना येथे मजबूत संघटन या ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रावसाहेब दानवे बोलत होते. यात ते म्हणाले, कि एक काळ असा होता शिवसेनेचे ३ आमदार आणि भाजपचा मी एकटा आमदार होतो. मात्र आज काळ असा आहे की भाजपचे ३ आमदार तर शिवसेनेचे २ आमदार आहेत. शिवाय राष्ट्रवादीचा (शरद पवार) कोणी आहे का आता? असा सवालही रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना विचारला.

भाजप नव्हे तर शिवसेना अशुद्ध झाली 

संघाने भाजपचा शुद्धीकरण केलं पाहिजे असं राऊत म्हणाले. यावर बोलताना दानवे म्हणाले, कि संजय राऊत जे बोलतात त्यांच्या बोलण्यामध्ये कुठलाही अर्थ राहिला नाही. पैसे उधळून निवडणुका जिंकल्या जात असतील, तर साठ वर्षे यांनी पैशाच्या बळावर सत्ता उपभोगली का? मुळात जनमताचा कौल आहे. चांगल शासन दिल तर लोक तुमच्या पाठीमागे असतात. विचारापासून जो पक्ष दूर गेला तो पक्ष संपला. मुळात भाजप अशुद्ध झालाच कुठे, अशुद्ध झाली ती शिवसेना, स्वतःचा विचार सोडून दुसऱ्यात शिरली ती. भाजप आपलय विचाराशी पक्का आहे, आमचे शुद्धीकरण करायची गरज नाही.

वक्फ बोर्डवर ऑब्जेक्शन घेण्याचे कारण काय?
वक्फ बोर्ड हा विषय सगळ्यांनी एकदा समजून घेतला पाहिजे. मुळात त्याचं का ऑब्जेक्शन आहे माहित नाही. यात जर गैर मुस्लिम सदस्य जर त्या बोर्डात नसेल, सर्व मुस्लिम सदस्य जर त्या वक्फ बोर्डात असतील तर ऑब्जेक्शन घेण्याचे कारण काय? राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना याला जर विरोध करत असेल, तर आम्हाला प्रश्न पडतो की बाळासाहेबांची शिवसेना कुठे आहे.  आजचे उद्धव ठाकरेंचे शिवसेना कुठे आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT