Maratha Reservation Saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी वकिल तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Jalna News : मराठा आरक्षणासाठी वकिल तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

लक्ष्मण सोळुंके

जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. शासन अजून निर्णय घेत नसून (Maratha Aarkshan) मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वकील असलेल्या तरुणाने जालन्यात आत्मदहनाचा प्रयत्न केला. (Jalna) जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा प्रकार झाला असून पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. (Tajya Batmya)

भाऊसाहेब वाडेकर असं आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील तरुणाचं नाव आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मागील आठवड्यापासून आंदोलन सुरु झाले आहे. याच दरम्यान जालन्यात आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले असून राज्यभरात याचे पडसाद उमटत आहेत. याच दरम्यान मराठा आरक्षण मिळावं या मागणीकरिता आत्मदहन करत असल्याचे भाऊसाहेब वाडेकर या तरुणाने सांगितले. 

पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने टळला अनर्थ 

जालना जिल्हाधिकारी कार्यालय आवारात झालेल्या या प्रकारात आंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील महिलांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न झाला आहे. भाऊसाहेब वाडेकर याने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदानाचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील आज बीड दौऱ्यावर

Navratri 2025: नवरात्रीत करा नारळाचा सोपा उपाय, होईल फायदा

Saptashrungi Gad : सप्तशृंगी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; या कालावधीत गडावर खासगी वाहतूक बंद

Rinku Rajguru: 'आवडतं तेच काम करं, आनंद नसेल तर...'; रिंकू राजगुरुला आई-वडिलांता मोलाचा सल्ला

Pune Water Cut : पुण्यात पाणीकपातीचं संकट! कोणत्या दिवशी कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?

SCROLL FOR NEXT