Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : जालना तहसील कार्यालयात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

Jalna News : जालना तालुक्यातील काही गावातील गायरान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे. जालना तहसील कार्यालय आवारात हे ठिय्या आंदोलन

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना तालुक्यातील पाचन वडगाव, हिस्वन आणि थेरगाव येथील ग्रामस्थांनी गायरान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाविरुद्ध (Jalna) जालना तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान एका महिला आंदोलकाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. (Live Marathi News)

जालना तालुक्यातील काही गावातील गायरान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे. जालना तहसील कार्यालय आवारात हे ठिय्या आंदोलन सुरु असून या आंदोलनाच्या दरम्यान आंदोलक महिलेने अंगावर डिझेल (Diesel) ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलीस (Police) व अन्य आंदोलकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. या घटनेने तहसील कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंदोलकांसोबत तहसीलदार चर्चेला 

घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तहसीलदार कार्यालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला. यावेळी आंदोलक आणि तहसीलदार छाया पवार यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू असून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT