Samruddhi Highway Accident Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Highway : भरधाव कारचे टायर फुटून अपघात

भरधाव कारचे टायर फुटून अपघात

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्यातून जाणारा समृद्धी महामार्गावर गोल्डन ब्रिजजवळ भरधाव वेगाने जात असलेल्‍या (Samruddhi Highway) कारचे टायर फुटल्याने कारचा अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. यात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. (Live Marathi News)

मुंबईहून जबलपूरकडे जाणाऱ्या कारच्‍या समोरचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे कार समृद्धी महामार्गाच्या मधोमध असलेल्या डिव्हायडर क्रॉस करून जाऊन आदळली आहे. या अपघातात चालकासह कारमध्ये असलेले प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघातांची मालिका सुरूच

अपघाताची माहिती मिळताच हायवे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन समृद्धी महामार्गावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने जखमेवर उपचार केले आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्ग अपघाताचा महामार्ग म्हणून असे नवी ओळख तयार झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिघाडी; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार

Maharashtra Civic Polls: राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर?निवडणुकांचा मुहूर्त मार्च 2026 नंतर ?

Maharashtra Live News Update: DRI मुंबईची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 1.718 किलो कोकेन जप्त

Vinod Tawde Bihar Role: बिहारच्या विजयामागे मराठी चेहरा, एनडीएच्या विजयाचे शिल्पकार तावडे?

बिहारमध्येही लाडकीचा डंका, बिहारची लाडकी गेमचेंजर?

SCROLL FOR NEXT