Jalna Saam Impact News Saam tv
महाराष्ट्र

Saam Impact News: महावितरणच्या अभियत्याला रॉयल एन्ट्री भोवली; निलंबन करत चौकशी समिती स्थापन

Jalna News साम बातमीचा मोठा दणका..महावितरणच्या अभियत्याला रॉयल एन्ट्री भोवली; निलंबन करत चौकशी समिती स्थापन

लक्ष्मण सोळुंके

जालना : आपली झालेली बदली रद्द करून पुन्हा त्याच जागेवर बदली करून घेतली. यानंतर आपला पदभार (Jalna) स्वीकारण्यापूर्वी डीजेच्या तालावर नाचत वाजत गाजत मिरवणूक काढून रॉयल एन्ट्री केली. हि एन्ट्री महावितरणच्या (Mahavitaran) अभियंत्याला चांगलीच भोवली असून त्याचे निलंबन करत चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

जालना महावितरण कार्यालयातील सहायक अभियंता पदावर कार्यरत असलेल्या प्रकाश चव्हाण या अभियंत्याची सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीनंतर एक महिन्यापूर्वी रत्नागिरी महावितरण कार्यालयात बदली करण्यात आली होती. प्रकाश चव्हाण या अभियंत्याने सर्वसामान्य नागरिकांच्या जिद्दीवर एका महिन्यात ही बदली रद्द करून पुन्हा त्याच पदावर वरिष्ठांना हाताशी धरून आपली बदली करून घेतली. जालना महावितरण कार्यालयात रुजू होण्यासाठी या अभियंत्याने गुत्तेदारांना हाताशी धरून डीजेच्या तालावर वाजत गाजत तब्बल दीड तास मिरवणूक काढली. चित्रपटातील एखाद्या हिरोचा सीनला साजेल अशा पद्धतीने एन्ट्री करत महावितरणच्या (MSEDCL) कन्हैयानगरच्या कार्यालयाच्या परिसरात गुत्तेदारासह डीजेच्या तालावर नाचत गाजत रुजू होण्यासाठी दाखल झाला होता. साम टीव्हीने या संपूर्ण प्रकाराचा परदा फास केल्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी तात्काळ कारवाई करत अभियंत्यासह ती जनाविरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये सार्वजनिक शांतता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

चौकशी समिती देणार अहवाल 
आता महावितरण विभागाकडून ही तडकाफडकी कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. महावितरणकडून या अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच महावितरणने या संपूर्ण बदली प्रकारावर चौकशी समिती स्थापन केली असून या अभियंत्याची बदली का रद्द करण्यात आली? संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता ही समिती करणार आहे. या समितीच्या अहवालानंतर दोषीवर कारवाई करण्यात येईल; अशी माहिती साम टीव्हीला महावितरण संचालक विश्वास पाठक यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT