Jalna News  Saam TV
महाराष्ट्र

Jalna: हॉटेलच्या खुर्चीवर नवजात अर्भक सोडून नातेवाईक पसार...

जालना अंबड महामार्गावरील बंद असलेल्या हॉटेलच्या खुर्चीवर पुरुष जातीचे नवजात अर्भग सोडून अज्ञात नातेवाईक सोडून फरार झल्याची घटना अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना: अंबड महामार्गावरील लालवाडी परिसरात सकाळी ५ च्या सुमारास ४६ वर्षीय संतोष चव्हाण हे मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना पारनेर शिवारात बंद असलेल्या सावता हॉटेलमधून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला असता त्यांनी जवळ जाऊन बघितले असता हॉटेलच्या खुर्चीवर त्यांना कपड्यामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळून आले असता, त्यांनी हॉटेल मालक दामोधर खरे यांना झोपेतून उठवून या बाबद माहिती दिली. त्या दोघांनी परिसरात अर्भकाच्या नातेवाईकाचा शोध ही घेतला.

मात्र त्या ठिकाणी कुणीच आढळून आलं नसल्यानं त्यांनी घटनेची माहिती तात्काळ अंबड पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून अर्भकास जालना येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात उपचरासाठी दाखल करत अज्ञात नातेवाईका विरुद्ध 317 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाळाच्या नाळाला स्टॅग लावलेला असून, उजव्या पायाच्या पंजाचा ठसा घेतल्याची शाईची निशाणी आहे, त्यामुळे त्याचा एखाद्या सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात जन्म झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांनी या बाळाला शासकीय बालकल्याण समितीकडे ताबा देण्यासाठी अंबड पोलीस सकाळपासून संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्क करत होते.

मात्र दिवसभर पोलिसांना कागदपत्रांच्या पूर्ततेच्या फेऱ्यात अडकवून अधिकाऱ्याकडून चालढकल केली गेल्याने या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे नवजात अर्भकाचे दिवसभर हाल झाले. शेवटी सायंकाळी उशिरा बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसाची सलग सुट्टी आहे. तुम्हीच सोमवारपर्यंत बाळाचा सांभाळ करा,असं उत्तर दिल्याने शेवटी अंबड पोलिस ठाण्याच्या दोन महिला पोलिस कर्मचारी आणि दोन महिला पोलिस कर्मचारी यांचाच जिल्हा महिला व बाल रुग्णालयात ताटकळत बसून राहण्याची वेळ आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : मुंबईच्या दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT