Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: कर्मचाऱ्यांना बाहेर काढत पंचायत समिती कार्यालयाला ठोकले कुलूप; मराठा समाज आक्रमक

Jalna News : कर्मचांऱ्याना बाहेर काढत पंचायत समिती कार्यालयाला ठोकले कुलूप; मराठा समाज आक्रमक

लक्ष्मण सोळुंके

जालना : आरक्षणासाठी मराठा समाजाकडून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरु आहेत. या दरम्यान (Jalna News) जालन्यातील बदनापूर शहरात मराठा आंदोलक आरक्षणाच्या (Maratha Aarkshan) मागणीसाठी आक्रमक झाले असून आंदोलकांनी शासकीय कार्यलयात घुसत कर्मचाऱ्यांना बाहेर काढत कार्यालयाला कुलूप ठोकले आहे. (Maharashtra News)

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज (Maratha Reservation) आक्रमक झालेला पाहण्यास मिळत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आरक्षण मिळावे यासाठी आग्रही मागणी केली जात आहे. जालन्यात आंदोलन सुरु असताना आंदोलकांनी बदनापूर तहसील व पंचायत समिती कार्यालयात घुसून महिला तहसीलदार आणि महिला कर्मचाऱ्यांना विनंती करून बाहेर काढले. यानंतर शासकीय कार्यालयांना टाळे ठोकायाला सुरवात केली आहे. आंदोलक सर्वच कार्यालये बंद करण्याच्या मार्गावर आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून कार्यालये बंद करण्यात येत आहेत. तहसिल, पंचायत समिती, नगर पंचायत, भूमी अभिलेख कार्यालयांना कुलूप ठोकण्यात आलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आंदोलक आक्रमक झाले आहे. त्यामुळे आता मराठा समाजाच्यावतीने शासकीय कार्यालयावर ताबा मिळवायला सुरवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT