Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: दुर्देवी घटना..शेततळ्यात तीन बालकांसह एका व्यक्तीचा बुडून मृत्यू

दुर्देवी घटना..शेततळ्यात तीन बालकांसह एका व्यक्तीचा बुडून मृत्यू

लक्ष्मण सोळुंके

जालना : शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन बालकांसह एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना (Jalna News) जालना तालुक्यातील सामनगाव येथे आज दुपारच्‍या सुमारास घडली. (Breaking Marathi News)

ओमकार कृष्णा पडूळ (वय ६), भागवत कृष्णा पडूळ (वय ९), युवराज भागवत इंगळे (वय ५) व भागवत जगन्नाथ (वय ३२) अशी मयतांची नावं आहेत. भागवत जगन्नाथ हा शेतात काम करत असताना शेतात असलेल्‍या शेततळ्यात मालकाची दोन मुलं आणि त्याचा एक मुलगा घेऊन शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र यावेळी पोहत असताना मुलं पाण्यात बुडू लागली. हे भागवत याच्‍या लक्षात आले. त्यांना वाचवण्यासाठी भागवत गेले असता त्यांचाही त्यात बुडून मृत्यू झाला.

रुग्णालयात परिवाराचा आक्रोश

दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर चौघांचेही मृतदेह बाहेर काढून जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT