Laxman Hake Hunger Strike Jalna:  Saamtv
महाराष्ट्र

Laxman Hake VIDEO : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली, शुगर आणि पाणी झालं कमी; उपचार नाकारले!

Laxman Hake Hunger Strike Jalna: ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके यांनी जालन्यातील वडीगोद्री गावात उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा सहावा दिवस असून हाके यांची प्रकृती खालावल्याचे दिसत आहे.

Gangappa Pujari

अक्षय गवळी, जालना|ता. १८ जून २०२४

एकीकडे मराठा आरक्षणावरुन पुन्हा वातावरण तापले असतानाच आरक्षण टिकण्यासाठी ओबीसी बांधवांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके यांनी जालन्यातील वडीगोद्री गावात उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा सहावा दिवस असून हाके यांची प्रकृती खालावल्याचे दिसत आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी पाणी पिण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली आहे. आज लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पथकाने वैद्यकीय तपासणी केली.

यावेळी दोन्ही आंदोलकांचे ब्लड प्रेशर चांगले आहे. माञ पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना चकरा येत आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांना आम्ही सलाईन घेण्याची विनंती केली मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही आज वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली. हे सरकार धनगर आरक्षण देत नाही, ओबीसी आरक्षणाला डिस्टर्ब करतय, मराठा आरक्षण देत नाही, फक्त भांडण लावायचं काम या सरकारकडून सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून हा प्लॅन केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT