Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna : पाण्यासाठी वणवण; जालन्यातील नानेगाव महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयात हंडा मोर्चा

Jalna News : राज्यातील अनेक भागात पाणी टंचाईची भीषणता जाणविण्यास सुरवात झाली आहे. यामुळे शेतशिवारात जाऊन पाणी आणण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्याच्या पुढील दिवसात टंचाई अधिक गडद होण्याचे चित्र आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. सध्या उन्हाच्या झळा वाढल्याने अनेक भागात पाणीटंचाईमुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अशाच प्रकारे जालना जिल्ह्यातील नानेगाव या गावात पाण्याची कायम समस्या आहे. यामुळे महिलांना गावाबाहेरून पायपीट करत पाणी आणावे लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला आहे. 

राज्यातील अनेक भागात पाणी टंचाईची भीषणता जाणविण्यास सुरवात झाली आहे. यामुळे शेतशिवारात जाऊन पाणी आणण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्याच्या पुढील दिवसात टंचाई अधिक गडद होण्याचे चित्र आहे. यातच जालना जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला असून बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथील संतप्त ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढत प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला. 

दोन वर्षांपासून टंचाईची समस्या 

गेल्या दोन वर्षांपासून या गावात भीषण पाणीटंचाई आहे. महिलांना रोज दोन- दोन किलोमीटर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. टंचाईच्या समस्येबाबत या पूर्वी अनेक वेळा ग्रामस्थांकडून निवेदन देण्यात आले, आंदोलन देखील करण्यात आले आहेत. पण याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. यामुळेच संतप्त झालेल्या महिलांनी आज थेट हंडा मोर्चा काढत समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. 

ठिय्या आंदोलनाचा दिला इशारा 

आजच्या मोर्चात ग्रामस्थांनी डोक्यावर हंडे घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. तसेच गावातील पाण्याची समस्या सोडवून पाण्याचे तात्काळ नियोजन करण्याची मागणी केली आहे. हि समस्या न सुटल्यास लेकरा- बाळांसह कार्यालयासमोर ठिय्या देण्याचा इशारा दिला आहे. आता या पाणीप्रश्नाकडे प्रशासन लक्ष देतं का, हे पाहण महत्त्वाचे असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ढगांच्या गडगटासह मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT