representative photo  saam tv
महाराष्ट्र

Jalna : धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; नागरिक इमारती मोकळ्या करत नसल्याने नगर परिषद हतबल

जालन्यातील ३० वर्षांपेक्षा जास्त वयोमर्यादा असलेल्या धोकादायक असलेल्या इमारतीची संख्या २९५ ते ३०० इमारती असल्याची धक्कादायक बाब नगर परिषदेच्या स्ट्रक्चरल ऑडिट नंतर समोर आली आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : जालन्यातील (Jalna) धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जालन्यातील ३० वर्षांपेक्षा जास्त वयोमर्यादा असलेल्या धोकादायक असलेल्या इमारतीची संख्या २९५ ते ३०० इमारती असल्याची धक्कादायक बाब नगर परिषदेच्या स्ट्रक्चरल ऑडिट नंतर समोर आली आहे. मात्र, या धोकादायक इमारतीमध्ये अजूनही नागरिक राहत असल्याने त्या खाली करायच्या कशा असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. (Jalna News In marathi)

जालन्यात नगर परिषदेच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये २९५ ते ३०० धोकादायक इमारती आढळून आल्यात आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. या नागरिकांना इतरत्र वास्तव्यास जाण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

मात्र, गेल्या महिनाभरापासून नागरिकांनी या इमारती खाली केल्या नाहीत. सदर इमारती या राहणाऱ्या नागरिकांच्या व्यक्तिगत मालमत्ता असल्याने त्यांना काढण्याचा अधिकार नगर परिषदेच्या प्रशासनाला नसल्याने या इमारती खाली करायच्या कशा असा प्रश्न नगर परिषद प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

त्यातच राज्यात गेल्या पाच दिवसापासून आतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असताना शहरासह जिह्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे इमारतीच्या भिंतीत पाणी जाऊन या इमारती (Building) कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इमारतीच्या वयोमर्यादा संपूनही अनेक वर्षे झाल्याने नागरिक इतरत्र वास्तव्य करत नसल्याने नगर परिषेद प्रशासना समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कदाचित काही दुर्दैवी घटना घडल्यास जबाबदार कोण असाही प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासन धोकादायक इमारती पुढे हतबल झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर अपहरण करून डांबून ठेवलं; लग्न करण्यासाठी तरुणाचं संतापजनक कृत्य

Mumbai Metro 5A: आनंदाची बातमी! लोकलच्या गर्दीतून सुटका होणार, उल्हासनगरपर्यंत धावणार 5A मेट्रो; कधीपर्यंत होणार सुरू?

Maharashtra News Live Update: नाशिकरोडमध्ये धक्कादायक प्रकार, तक्रार न घेतल्याच्या रागातून युवकाचा टोकाचा निर्णय

जगाची धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार; होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेने इराणची ३१ जहाजे रोखली

Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकमधील प्रसिद्ध डॉक्टरचं नाव समोर; गर्भपातासाठी करायचा मदत

SCROLL FOR NEXT