Jalna News Saam Tv
महाराष्ट्र

Jalna News: लाठी-काठी आणि पट्ट्यानं अमानुष मारहाण; ४५ जणांनी तिघांना चोर समजून बेदम मारले, व्हिडीओ व्हायरल

Jalna: जालन्यामधील मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यावर पोलिसांना तब्बल ४५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावर तपास सुरु असून दोषींवर लवकरच कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Saam Tv

अक्षय शिंदे (साम टीव्ही)

Jalna News: चोर समजून जमावाने तिघांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना काल (३० डिसेंबर) सायंकाळी जालना जिल्ह्यात घडली आहे. जालन्यामधील गुळखंड तांडा येथे ही घटना झाली आहे. भांडी घासायची पावडर विकण्यासाठी आलेल्या तिघांना जमावाने लाठी, काठ्या आणि पट्ट्याने बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

इंदर कुमार साह हा तरुण त्याच्या दोन साथीदारांसह भांडी घासायची पावडर विकण्यासाठी गुळखंड तांडा येथे आला होता. जमावातील दोघांनी हे चोर आहेत असे म्हणत लोकांची गर्दी जमवली. पुढे गर्दीतील लोकांनी लोखंडी पाईप, काठ्या, लाकडी दांड्यांनी तिघांना अमानुषपणे मारहाण केली. मारहाणीमध्ये तिघेही गंभीर जखमी झाले.

परतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर रोजी सायंकाळी तिघेजण भांडे घासण्याची पावडर विकण्याच्या हेतूने जालना जिल्ह्यातील गुळखंड तांडा गावात आले होते. तेथे दोन-तीन जणांनी हे चोर आहेत असा दावा करत परिसरातील लोकांना बोलावले. पुढे संतप्त जमावाने या तिघांनाही जबर मार दिला.

मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी जमावातील ४५ लोकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तपास सुरु असून दोषींवर लवकरच कारवाई होईल असे परतूर पोलिसांनी म्हटले आहे. याशिवाय जखमी झालेल्या तिघांवर उपचार सुरु असल्याचेही म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT