Lok Sabha Election Saam tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election : जालन्यातून जरांगे पाटलांनीच निवडणूक लढावी; मराठा समाजाच्या बैठकीत ठराव

Jalna News : जालना लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा उमेदवार निवडावा किंवा अपक्ष उमेदवार उभा करावा; या बाबत आज जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद, जालना आणि बदनापूर तालुक्यातील मराठा समाजाच्या बैठका घेण्यात आल्या.

लक्ष्मण सोळुंके

जालना : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना प्रत्येक पक्ष उमेदवारांचे नाव जाहीर करत आहे. या दरम्यान (Jalna) जालना लोकसभेसाठी मनोज जरांगे पाटील यांनीच उमेदवारी दाखल करावी. अपक्ष उमेदवार नकॊच; असा ठराव मराठा समाजाच्या वतीने आयोजित बैठकीमध्ये एकमताने संमत करण्यात आला. (Latest Marathi News)

जालना लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) मराठा समाजाचा उमेदवार निवडावा किंवा अपक्ष उमेदवार उभा करावा; या बाबत आज जिल्ह्यातील (Bhokardan) भोकरदन, जाफ्राबाद, जालना आणि बदनापूर तालुक्यातील मराठा समाजाच्या बैठका घेण्यात आल्या. या समाजाच्या बैठकीत मराठा समाजाने स्वातंत्र्य उमेदवार दिला, तर त्याचा परिणाम काय होईल.? यावर चर्चा करण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

समाजाच्या अपक्ष उमेदवारामुळे आरक्षण आंदोलनाला विरोध करणाऱ्या पक्षाला याचा मोठा फायदा होईल, अशी शंका या बैठकीत उपस्तित करण्यात आली. यावरून (Manoj Jarange Patil) जरांगे पाटील यांनीच उमेदवारी करावी असा बैठकीत एकमताने परित करण्यात आलेला ठराव तात्काळ जरांगे पाटील यांना पाठवण्यात आला. यावर मनोज जरांगे पाटील उद्या काय निर्णय घेतात हे पाहणं अत्ता महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Update: Mumbai: दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या तरुणाला अटक

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT