Manoj Jarange-Patil  Saamtv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी कधी करणार?, दिवस सांगितल्याशिवाय उपोषण मागे नाही; मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation: मराठा आक्षणावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी कधी करणार याची तारीख सांगितल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्टपणे सांगितले आहे.

Priya More

मराठा समजाला आरक्षण (Maratha Arakshan) मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर आरोप केले आहेत. 'सरकारने हे जाणून बुजून षडयंत्र रचले आहे. सरकारने शब्द फिरवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीने नवं षडयंत्र रचले आहे.', असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी कधी करणार? असा सवाल करत दिवस सांगितल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी कधी करणार? किती दिवसात करणार?, आमच्यावरील गुन्हे कधी मागे घेणार?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केला आहे. 'माझा आणि माझ्या समजाचा राजकारण हा अजेंडा नाही. आम्हाल आमची मुलं मोठी करायची आहेत. त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी ही आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे व्हावे. आमचा जास्त काही हट्ट नाही. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी कधी करणार हे स्पष्टपणे सांगितल्यानंतर उपोषण स्थगित करू.', असे जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.

जरांगे पाटील यांनी पुढे असे सांगितले की, 'ओबीसी नेते समजून घेत नाही. ओबीसीला धक्का लागत नाही. ओबीसीशी काही संबंध येत नाही. कारण मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा आहे. उगाचच ते आढेवेढे घेत राज्यात जाणूनबुजून तेढ निर्माण करत आहेत. काही जण तर प्रसिद्धीसाठी इथे अंतरवाली सराटीमध्ये येऊन बसतात. प्रत्यक्ष येऊन चर्चा केल्याशिवय आम्ही कसा विश्वास ठेवणार. आंदोलकाचे काम असते की सरकारवर विश्वास ठेवणे. आम्ही विश्वास ठेवला आहे. आम्ही थोडे दिवस उपोषण करू. आम्ही किती दिवस उपोषण करणार. तुम्ही जाणूनबुजून जर आम्हाला मारायला निघाले असाल तर आम्ही विधानसभेच्या तयारीला लागू. प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतरच उपोषण मागे घेतले जाईल.'

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देखील दिला. त्यांनी सांगितले की, 'षडयंत्र करू नका नाय तर लय महागात पडेल. मला आणि माझ्या समजाला आरक्षण पाहिजे. मग कोणी पण द्या. माझा सरकारवर आणि शिंदेसाहेबांवर विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस शत्रू नाही आमचे. पण ते काड्या करतात. ते आम्हाला जमत नाही. आरक्षणाच्या विरोधात बोलले तर मी ऐकून घेत नाही. मराठ्यांवर होणारा अन्याय मी सहन करू शकत नाही.' तसंच, 'हे माझे शेवटचं उपोषण असणार आहे. मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागेल. हे उपोषण थांबले तर मी ऐकणार नाही.', असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: मविआत वाद? अनिल गोटे की जहागिरदार नेमका उमेदवार कोण? धुळ्यात उमेदवारीवरून पेच कायम

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT