Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Leopard : जालना शहरात बिबट्याचा वावर; कॉलनीतील सीसीटीव्हीत झाला कैद

Jalna News : जालना शहरातील वन विद्यानाजवळ असलेल्या शितल विहार कॉलनीत रात्रीच्या सुमारास बिबट्या फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: जालना शहरातील शीतल विहार कॉलनीत बिबट्याचा वावर असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तर याच भागात एक बकरीचे शीर आणि धड वेगळं असलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान वन विभागाकडून परिसरात पाहणी करण्यात आली आहे. 

जालना (Jalna) शहरातील वन विद्यानाजवळ असलेल्या शितल विहार कॉलनीत रात्रीच्या सुमारास बिबट्या फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा बिबट्या (Leopard) कैद झाल्याने जालना शहरांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरची माहिती वन विभागाला देण्यात आली. यानंतर वन विभागाचे पथक कॉलनीत दाखल झाले असून याची पाहणी करत आहेत. दरम्यान नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता रात्री अपरात्री घराबाहेर पडणे टाळावे. तसेच एकटे फिरणे टाळावे असं आवाहन वन विभागाकडून (Forest Department) करण्यात आलंय.

परिसरात लावले तीन ट्रॅप कॅमेरे 

वन विभागाने दक्षता घेत या परिसराची पाहणी केली असून, तीन ट्रॅप कॅमेरेही या भागात लावण्यात आले आहे. दरम्यान जालना शहराला लागून असलेल्या वन विभाग परीक्षेत्रामध्ये विभक्त झालेले मृत हरण आढळले होते. या हरणाच्य पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये हिंस्र प्राण्यांनी शिकार केल्याचे देखील निष्पन्न झालं आहे. त्यामुळं वनविभागाने वनउद्यान सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT