HSC Exam Saam tv
महाराष्ट्र

HSC Exam : शिक्षकही पेपर न घेताच परतले; केंद्रप्रमुखांनी फोन करत बोलवूनही परीक्षेला आले नाही विद्यार्थी

शिक्षकही पेपर न घेताच परतले; केंद्रप्रमुखांनी फोन करत बोलवूनही परीक्षेला आले नाही विद्यार्थी

लक्ष्मण सोळुंके

जालना : एकीकडे राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहे. यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. जालन्यातही (Jalna News) शिक्षण विभागाबरोबरच जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न करून परीक्षा (HSC Exam) केंद्रांवर भेटी देतायत. काल जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी कॉपी करताना १६ विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडलं आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलंय. (Letest Marathi News)

जालन्यातील जामवाडी येथील रंगनाथराव पाटील परीक्षा केंद्रावर हिंदी विषयाच्या परीक्षेसाठी एकही विद्यार्थी फिरकला नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोलीस, केंद्रप्रमुख यांच्यासह सर्वांना ताटकळत बसावं लागले. आज बारावीचा हिंदी विषयाचा पेपर होता. राष्‍ट्रभाषेचा पेपर असताना या विषयाकडे विद्याथ्‍र्यांनी पाठ फिरविल्‍याचे पहावयास मिळाले.

फोन करूनही आले नाही विद्यार्थी

हिंदी हा विषय दोनच विद्यार्थ्यांनी घेतलेला होता. मात्र केंद्र प्रमुखांनी दोन्हीही विद्यार्थ्यांना फोन लावून परिक्षेला बोलावले, तरीही विद्यार्थी परीक्षेसाठी आले नाहीत. त्यामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेत शुकशुकाट पाहायला मिळाला. एकही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी न आल्यानं शिक्षकांना देखील पेपर न घेताच रिकाम्या हातानं परीक्षा केंद्रावरून मागे परतावं लागलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आगामी नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये महायुतीतही बेबनाव

शरद पवारांचा धनंजय मुंडेंना धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश, मुंडेंवर आरोप करत सगळंच बाहेर काढलं

Bihar Tourist: बिहारमधील टॉप १० ठिकाणे, आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या

Rashmika Mandanna: रश्मिका मंदान्नाने परिधान केली सुंंदर सॅटिन साडी, पाहा फोटो

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मनसे- मविआची युती झालीच, नाशिकच्या राजकारणात नवं समीकरण

SCROLL FOR NEXT