Jalna News
Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्याचं शोले स्टाइल आंदोलन; दिला आत्‍मदहनाचा इशारा

लक्ष्मण सोळुंके

जालना : पावरग्रेड कापोर्रेशनच्या विद्युत टावरमुळे झालेल्या नुकसणीचे पंचनामे आणि मूल्यांकन होऊन तब्बल १३२ महिने उलटले. तरी देखील नुकसान भरपाई मिळालेली नाही. यामुळे बदनापूर (Badnapur) तालुक्यातील अकोला- निकलक, गोकुळवाडी गावातील शेतकऱ्यांनी (Farmer) विद्युत टॉवरवर चढून तात्काक नुकसान भरपाईची मागणी केली. टॉवरवर चढून आत्मदहनाचा इशारा दिला. (Breaking Marathi News)

बदनापूर तालुक्यातील अकोला- निकळक व गोकुळवाडी शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात एक वर्षापुर्वी पावरग्रेड कापोर्रेशन ऑफ इंडिया लि. या कंपनीच्यावतीने ७६५ के.व्हि वर्धा- औरंगाबाद ही लाईनचे टॉवर उभारण्यात आले आहे. त्यामुळे बदनापूर तालुक्यातील अकोला निकळक शिवारातील गट क्रमांक २२१, २२२, २२३ गोकुळवाडी शिवारातील गट क्रमांक १५, ३१, १३, २१, १२ या शिवारातील शेतकऱ्याचं पिकांसह मोसंबी, डाळींब, सीताफळ, पेरू, शेवगा, चिंच, आंब्याच्या बागेचे मोठं नुकसान झाले आहे.

या नुकसानीचे पंचनामे आणि मूल्यांकनही कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले. तब्बल पंचनामेहुन वर्ष उलटूनही कंपनी प्रशासनाकडून नुकसान भरवाई मिळत नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनही कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने नुकसान भरपाई तात्काळ द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज शोले स्टाइल आंदोलन केले. तात्काळ मोबदला न मिळल्यास आत्मदनाचा इशारा देत आंदोलक शेतकऱ्यांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : आम्ही कायम भांडत रहावं आणि...; आदित्य ठाकरेंच्या आरोंपांवर दीपक केसरकरांचा पलटवार

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT