ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लोक आपले केस निरोगी, चमकदार आणि मजबूत ठेवण्यासाठी विविध प्रकारचे तेल आणि शॅम्पू वापरतात.
बरेच लोक आपल्या केसांना विविध हेअर पॅक आणि मेंदी लावतात. बहुतेक लोक केस रंगवण्यासाठी काळ्या मेहंदीचा वापर करतात.
काळी मेहंदी लावल्याने पांढरे केस काळे होऊ शकतात. याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत. तर जाणून घ्या दुष्परिणाम.
काळ्या मेहंदीचा वापर केल्याने स्कॅल्प इंनफेक्शन होऊ शकते. यामुळे स्कॅल्पवर खवले येऊ शकतात.
काळ्या मेहंदीच्या नियमित वापरामुळे केसांमध्ये खाज आणि कोंड्याची समस्या देखील उद्भवू शकते.
मेहंदीमध्ये अनेक केमिकल्स असतात, ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात.
जर तुम्ही काळी मेहंदी वारंवार वापरली, तर त्यामुळे केस गळण्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते.
काळी मेहंदी केसांचा रंग तात्पुरता गडद करते, परंतु कालांतराने ती केसांचा नैसर्गिक रंग प्रत्यक्षात फिका करते.