Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: अकाउंटंट असलेल्या कर्मचाऱ्याने संपविली जीवनयात्रा; जालना नगरपरिषदेत खळबळ

अकाउंटंट असलेल्या कर्मचाऱ्याने संपविली जीवनयात्रा; जालना नगरपरिषदेत खळबळ

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना नगरपरिषद कार्यालयात अकाउंट विभागात कार्यरत अकाउंटंट असलेल्या कर्मचाऱ्याने राहत्या घरात (Jalna News) गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना आज सकाळी ९ वाजता उघड झाली. या घटनेने शहरासह नगर परिषद परिसरात एकच खबळ उडाली. (Live Marathi News)

अनंता भीमाशंकर लांडे असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. लांडे हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत असल्याने कौटूंबिक वाद सुरू होते. या वादातून त्यांनी रात्री जालना येथील खरपुडी परिसरात असलेल्या हरी गोविंदनगरमधील राहत्या घरात पत्नी झोपलेली असताना मागच्या खोलीत जाऊन गळफास लावला.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे. मनमिळाऊ कर्मचाऱ्याने अचानक आत्महत्या केल्याने शहरासह नगर परिषद कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT