Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime: अल्‍पवयीन मुलीवर वृद्धाचा अत्‍याचार; पिडीत दोन महिन्‍याची गरोदर

अल्‍पवयीन मुलीवर वृद्धाचा अत्‍याचार; पिडीत दोन महिन्‍याची गरोदर

लक्ष्मण सोळुंके

जालना : एका 65 वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्‍याची घटना जालना जिल्ह्यातल्या परतूर (Partur) शहरात घडली आहे. सदर पिडीत अल्पवयीन मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्‍याची धक्‍कादायक (Crime News) बाब देखील समोर आली आहे. (Letest Marathi News)

जालना (Jalna) जिल्ह्यातल्या परतूरमध्ये एका ६५ वर्षीय वृद्धाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडलीय. मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिल्याने ही धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे शहरात एकच खबळ उडाली आहे. बशीर पाशा देशमुख नराधम आरोपीचे नाव आहे. शहरात एक अल्पवयीन मुलगी तिच्या वडिलांसोबत नेहमी मोंढ्यात जात होती. तिथे बशीर नावाच्या व्यक्तीने या अल्पवयीन मुलीला चॉकलेट देत मुलीशी जवळीक वाढवली.

चॉकलेटचे आमिष दाखवत वारंवार अत्‍याचार

शहरातीलच एका खोलीत त्या मुलीला चॉकलेट देण्याच्या आमिषाने घेवून गेला आणि त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देत त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे ही मुलगी दोन ते तीन महिन्यांची गरोदर झाल्याने ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पीडित मुलीने वडिलांसोबत परतूर पोलिसात धाव घेऊन या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान आरोपी नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT