Jalna Viral Video Saam Tv
महाराष्ट्र

Jalna Viral Video : पोलिसांच्या गाडीवर मद्यपीचा तुफान राडा; व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

ऐन रात्रीच्या वेळी झालेल्या या गोंधळामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती.

लक्ष्मण सोळुंके

Jalna News : जालना शहरातील चंदनझीरा पोलिसांच्या गाडीच्या बोनटवर बसून एका मद्यपीने गोंधळ घातल्याची घटना रविवारी रात्री १० च्या सुमारास बदनापूर -जालना महामार्गावरील हॉटेल अथर्व जवळ घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आल आहे. (Latest Marathi News)

एक महिला आणि एक पुरुष जालना रोड वरील औद्योगिक परिसरात गोधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या या व्यक्तीने पोलिसांची गाडी पाहताच पोलिसांच्या गाडीच्या बोनाटवर बसून गोंधळ घालायला सुरुवात केली.

तो कुणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी जवळपास अर्धा तास त्याची समज काढून त्याला चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात त्याला समज देऊन सोडून देण्यात आले.

ऐन रात्रीच्या वेळी झालेल्या या गोंधळामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती. बोनटवर बसून, हातवारे करीत मोठ-मोठ्याने बोलत गोंधळ घालत असलेल्या या मद्यपीमुळे या परिसरात चांगलीच गर्दी झाली होती. मद्यपी पोलिसांच्या वाहनाच्या बोनटवरच बसून गोंधळ घालत असल्याच्या या घटनेनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर (Social Media) चर्चेला उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT