Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : पैसे परत मिळावे म्हणून ठेवीदारांनी अधिकाऱ्यांना शेतात ठेवले डांबून; ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटीचे ठेवीदार संतप्त 

Jalna News : नोव्हेंबर महिन्यात या सोसायटीचे अध्यक्ष श्री. कुटे यांच्यावर ईडीचा छापा पडल्याने ही बँक डबघाईला आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सर्व ठेवीदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालन्याच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्या परतुर शहरातील शाखा मागील आठ दिवसांपासून बंद आहेत. (Jalna) यामुळे ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे आपल्या ठेवी परत मिळाव्या यासाठी ठेवीदारांनी अधिकाऱ्यांना शेतात डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. (Breaking Marathi News)

जालन्यातील ज्ञानराधा मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्या परतुर (Partur) शहरातील शाखा आठ दिवसांपासून बंद असल्याने ठेवीदारात संभ्रम निर्माण झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात या सोसायटीचे अध्यक्ष श्री. कुटे यांच्यावर ईडीचा छापा पडल्याने ही बँक(Bank) डबघाईला आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सर्व ठेवीदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एक महिन्याच्या आत सर्वांचे पैसे परत करू; असे आश्वासन संचालक मंडळाकडून देण्यात आले होते. त्यानंतर तीन महिने ही शाखा सुरळीत चालली. मात्र प्रत्येक वेळी आपले पैसे परत मिळावे, यासाठी ठेवीदार चकरा मारत होते. पण त्यांच्या हाती निराशा आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान आज ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे कर्मचारी तीन महिन्यानंतर परतूर या ठिकाणी दाखल झाले. मात्र ठेवीदारानी पैसे परत मिळावे, म्हणून या अधिकाऱ्यांना चक्क शेतात डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. या बँकेत परतूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात व्यापारी, नोकरदार, शेतकरी यांच्या ठेवी आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika- Ranveer Daughter: अहाहा! किती गोड दिसतेय, रणवीर आणि दिपिकाची मुलगी, फोटो पाहिलेत का?

Maharashtra Live News Update: पुण्यात दिवाळी पाडव्याची धूम, सारसबागमध्ये तरुणाईंची गर्दी

Diwali Padwa: दिवाळीचा आजचा दिवस सोन्यासारखा! पाडव्याच्या मुहूर्तावर या राशींना मिळणार भाग्याची साथ

Thane Tourism : शहराच्या गोंगाटापासून दूर निवांत ठिकाणी घालवा येणारा वीकेंड, बेस्ट लोकेशन आताच नोट करा

HBD Parineeti Chopra : राघव चड्ढाची 'परी' किती कोटींची मालकीण? आकडा वाचून डोळे फिरतील

SCROLL FOR NEXT