Latur Farmer End Life Saam Tv
महाराष्ट्र

Jalna News: जालन्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळलं

Jalna Farmer End Life: जालन्यामध्ये तरुण शेतकऱ्याने कर्जबाजापीपणाला कंटाळून आत्महत्या केलीची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस तपास करत आहे.

Priya More

अक्षय शिंदे, जालना

जालन्यात तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील महाकाळा येथील ही घटना आहे. शनिवारी या शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दत्ता शेळके (वय 36 वर्षे) असं या शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याप्रकरणी जालन्यातील गोंदी पोलिस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील महाकाळा येथे दत्ता शेळके हा तरुण शेतकरी आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. या शेतकऱ्याने शेतीसाठी कर्ज घेतले होते. पण शेतीतून चांगले उत्पन्न येत नव्हते आणि घरची जबाबदारी यामुळे हा शेतकरी चिंतेत होता. या शेतकऱ्याने शनिवारी आपल्या राहत्या घरी लोखंडी पाईपला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

दत्ता शेळके या शेतकऱ्याच्या आत्महत्येचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला आहे. कर्जबाजारीपणामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्या निधनामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास आता गोंदी पोलिस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT