Farmer Suicide 
महाराष्ट्र

हतबल शेतकऱ्याचा घरातच गळफास; अतिवृष्टीने नुकसान

अतिवृष्टीने नुकसान; हतबल शेतकऱ्याचा घरातच गळफास

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : अतिवृष्‍टीमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. उत्‍पन्‍न शुन्‍य झाले. यात बँकेकडून कर्ज घेतले असल्‍याने ते फेडायचे कसे? हा प्रश्‍न देखील त्‍यांच्‍यासमोर होता. यामुळे हतबल झालेल्‍या शेतकऱ्यांने घरात गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना घुंगर्डे हातगाव गावात घडली. (jalna-news-crop-loss-heavy-rain-and-bank-loan-farmer-suicide)

घुंगर्डे हातगाव गावातील रामभाऊ नारायम कदम (वय ५५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून अंबड तालुक्यातील घुंगर्डे हातगाव गावचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आले आहे. रामभाऊ कदम यांनी आपल्या राहत्या घरात रात्री लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेनची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू आहे.

दहा एकर जमीनीतील उस गेला वाहून

कदम यांच्‍याकडे १० एकर शेत जमीन असून त्यांनी त्यावर ऊस पिकांची लागवड केली होती. मात्र परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेताजवळ असलेल्या गलाटी नदी पात्राला आलेल्या महापुरामुळे शेती पूर्णपणे खरडुन गेल्याने ते गेल्या काही दिवसांपासून उदास होते. त्यातच त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँक गोदी शाखेचे ५१ हजाराचे कर्ज असल्याने ते फेडायचे कसे? या विवेचने होते. याच विवेचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती ग्रामस्तानी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

Sunday Horoscope : आज 'या' राशींना मिळणार मोठी संधी; कामाचा ताण होणार कमी, वाचा रविवारचे राशीभविष्य

Weather Update : ऊन-सावल्यांचा खेळ अन् विजांचा कडकडाट! महाराष्ट्रातील 'या' भागांमध्ये पावसाचा इशारा, जाणून घ्या आजचे हवामान

Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका लहान मुलांमध्ये का वाढतोय? 'या' ६ कारणांकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर...

पेपरफुटीच्या घटनांनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; भरती प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना

SCROLL FOR NEXT