Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime News: पत्नीला त्रास देवून आत्महत्येस केले प्रवृत; नायब तहसीलदार पतीवर गुन्‍हा

पत्नीला त्रास देवून आत्महत्येस केले प्रवृत; नायब तहसीलदार पतीवर गुन्‍हा

लक्ष्मण सोळुंके

जालना : शहरातील मोतीबाग परिसरात असलेल्या मोती तलावात दुपारच्या सुमारास एका ४८ वर्षीय विवाहितेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. जयश्री गणेश पोलास असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असल्याची माहिती पोलिस (Police) तपासात समोर आली. यानंतर जालना (Jalna) शहरात एकच खबळ उडाली होती. (Maharashtra News)

जयश्री पोलास या जालना तालुक्यातील नेर जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. तर नायब तहसीलदार गणेश पोलास यांच्या पत्नी होत्या. नायब तहसीलदार गणेश यांचे इतर एका महिलेशी संबंध असल्याने गणेश हा आपल्या पत्नीला त्रास (Crime News) देत होता. त्यातून त्यांच्यात वाद होत होते. गणेश पोलास यांच्या त्रासाबाबत त्‍यांचा मोठा भाऊ महेश पोलास आणि सासू सासरे यांच्याकडे तक्रारी केल्यामुळे गणेश हा जयश्रीला जास्त त्रास देत होता.

त्यांच्या त्रासाला कंटाळून जयश्री यांनी आत्महत्या केली असल्याने तिच्या आत्महत्येस गणेश पोलास जबाबदार आहे. अशी तक्रार जयश्री यांचे भाऊ संजय बाबूंलाल चितळ यांनी चंदणझिरा पोलिस ठाण्यात दाखल केली. त्या तक्रारीवरून गणेश पोलास यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गणेश पोलास यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक तपास चंदणझिरा पोलिस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng : वैभव सूर्यवंशी, इशान किशन की तिलक वर्मा... कोणाला देणार डच्चू? इंग्लंडविरुद्ध संघात संजू सॅमसनची पुन्हा होणार एन्ट्री

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई! मृत महिलेच्या घराची झाडाझडती घेतली, पोलिसांनी दार उघडला, आतील दृश्य बघून हादरले

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला भेट देणार

Heart attack prevention: हार्ट अटॅक टाळण्यासाठी कार्डिओलॉजिस्ट फॉलो करतात ६ सवयी; तुम्हीही आजच सुरू करा...

Nails Care : नखांवरील सफेद डाग असू शकतात या गंभीर आजाराची लक्षणे

SCROLL FOR NEXT