Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : दहा हजाराची लाच; अभियंत्यासह कॉम्पुटर ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

दहा हजाराची लाच; अभियंत्यासह कॉम्पुटर ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

लक्ष्मण सोळुंके

जालना : रोजगार हमी योजने अंतर्गत केलेल्या कामाचे मस्टर काढण्यासाठी भोकरदन पंचायत समितीच्या कार्यालयात कंत्राटी अभियंत्यासह कॉम्प्युटर ऑपरेटरने लाच (Bribe) मागितली. जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Jalna News) पथकाने साडेतीन हजाराची लाच घेताना रंगेहात ताब्यात घेऊन अटक केल्याची घटना घडलीय. या घटनेने पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

भोकरदन पंचायत समितीतील प्रशांत रामेश्वर दहातोंडे, सतीश रामचंद्र बुरंगे असं ताब्यात घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. भोकरदन तालुक्यातील दावतपुर ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर असलेल्या सार्वजनिक विहरीचे खोदकाम झाल्यानंतर अकुशल मजूर यांचे थकित मस्टर काढण्यासाठी कंत्राटी अभियंता दहातोंडे याने पंचासमक्ष सात हजाराची व कॉम्प्युटर ऑपरेटर बुरंगे याने पंचा समक्ष तीन हजाराची अशी एकूण दहा हजाराच्या लाचेची मागणी केली.

यातील कंत्राटी अभियंता यांनी आज कार्यालयात सात हजाराची लाच स्विकारत व तर कॉम्प्युटर ऑपरेटर यांनी पंचासमक्ष लाच मागितल्या प्रकरणी पंचायत समिती कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा (ACB) पथकाने तब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : JEE परीक्षा केंद्रावर गोंधळ; विद्यार्थिनीला उशिरा आल्याने प्रवेश नाकारला, २ वर्षांची मेहनत मातीमोल

शनिवार ठरला घातवार, नाशिकनंतर धुळ्यात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : अमरावतीच्या मेळघाटात मुसळधार पावसासह जोरदार गारपीट

IPL अर्ध्यावर सोडून कर्णधार अचानक मायदेशी परतला, सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा झटका

Gold Earrings Designs: डेली वेअरसाठी सोन्याच्या कानातल्यांचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, प्रत्येक महिलेला शोभून दिसतील

SCROLL FOR NEXT