Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News: पैशाच्या वादातून दोन गटात राडा; कारने चिरडण्याचा प्रयत्न, चार ते पाच जण जखमी

पैशाच्या वादातून दोन गटात राडा; कारने चिरडण्याचा प्रयत्न, चार ते पाच जण जखमी

लक्ष्मण सोळुंके

जालना : तालुका पोलिस ठाण्याच्या पानशेंद्रा शिवारात दोन गटात राडा झाला. पैशांच्‍या वादातून हा प्रकार झाल्‍याची माहिती समोर आली असून या घटनेत चारचाकी (Crime News) गाडी अंगावर नेत चिरडण्याचा प्रयत्‍न देखील झाल्‍याचा धक्‍कादायक प्रकार घडला आहे. (Letest Marathi News)

जालना (Jalna News) तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पानशेंद्रा शिवारात जालना (Jalna) शहरातील दिनेश आदमाने आणि विजय गोंदलेकर या दोन गटात गहाण ठेवलेल्या चारचाकी वाहनांच्या पैशाच्या देवाण- घेवाणीवरून मध्यरात्रीच्या सुमारास पानशेंद्रा शिवारात लाहोटी फार्महाऊसजवळ दोन्ही गट समोरासमोर आले. यामुळे तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. दोन्ही गटांनी लोकांना एकमेकांना लोखंडी रॉड, काठ्यालाठ्यांनी मारहाण केल्याने चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच एका गटाने चारचाकी कार अंगावर घालण्याचा प्रयन्त केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरल्याने घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर दिनेश आदमाने यांच्या फिर्यादीवरून विजय गोंदलेकर याच्यासह 7 जणांविरुद्ध आणि विजय गुंडलेकर याच्या फिर्यादीवरून दिनेश आदमाने यांच्यासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT