Jalna News Saam Tv
महाराष्ट्र

Jalna News: आंदोलनात भाजपचे दोन गट; अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध

आंदोलनात भाजपचे दोन गट; अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध

लक्ष्मण सोळुंके

जालना : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. याचा निषेध करत स्वयंघोषीत भाजप जिल्हा कार्यकारणीकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी पोस्‍टरला जोडे मारून आंदोलन केले. (Letest Marathi News)

जालन्यातील (Jalna News) छत्रपती संभाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी लोणीकर गटाच्या 15 कार्यकर्त्यानी हे आंदोलन करत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरुध्द जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्या पोस्टरला जोडे मारत अजित पवार यांच्या संभाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.

भाजपच्‍या दोन गटांचा वाद चव्‍हाट्यावर

आंदोलनात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे गटाच्या जिल्हाध्यक्षासह कार्यकरणीने पाठ फिरवत शहरातील गांधी चमन या ठिकाणी स्वतंत्र आंदोलन केले. यामुळे जालन्यात पुन्हा एकदा भाजपच्या (BJP) दोन जिल्हा कार्यकरणीचा प्रश्न चव्‍हाट्यावर आला आहे. त्यामुळे जालन्यात खरी भाजपा कार्यकारणी कुणाची असा प्रश्न उपस्‍थीत केला जात आहे. दरम्यान दानवे यांच्या आंदोलनाला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यानी हजेरी लावली. तर लोणीकर यांच्या आंदोलनाला फक्त १० ते पंधरा कार्यकर्ते उपस्‍थीत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

Crime : बलात्कारपीडित १३ वर्षीय मुलीला न्याय हवा होता, ज्याच्याकडे मदत मागितली त्या वकिलानेही केले अत्याचार

Jana Nayagan: विजय थलापतींच्या 'जन नायकन'च्या रिलीजची तारीख ठरली; नवीन पोस्टर प्रदर्शित करत केली मोठी घोषणा

Bhandardara Tourism : छत्रीसारखा दिसणारा महाराष्ट्रातील 'हा' अनोखा धबधबा पाहिला का?

Children High BP : लहान मुलांनाही होतो BP चा त्रास? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती अन् लक्षणे

SCROLL FOR NEXT