Jalna ZP School Saam tv
महाराष्ट्र

Jalna ZP School : जिल्हा परिषदेच्या शाळेत बांगड्या, हळदी- कुंकू आणि बाहुली; जालन्यातील गोंदी येथे जादूटोण्याचे कृत्य समोर

Jalna News : जिल्हा परिषद शाळांची अवस्था बिकट असल्याचे चित्र सर्वत्र पाहण्यास मिळते. शाळांमधील वर्गाना खिडकी, दरवाजे नसल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. यामुळे शाळेच्या आवारात कोणीही प्रवेश करत असतो.

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: जिल्हा परिषदेच्या शाळेत जादूटोणा केल्याचे कृत्य धक्कादायक समोर आले आहे. जालन्यातील गोंदी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बांगड्या, हळद- कुंक आणि बाहुली आढळून आली आहे. हा प्रकार शनिवारी घडला असून या घटनेमुळे खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांनी वर्गातून बाहेर पाल काढला होता. 

जिल्हा परिषद शाळांची अवस्था बिकट असल्याचे चित्र सर्वत्र पाहण्यास मिळते. शाळांमधील वर्गाना खिडकी, दरवाजे नसल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. यामुळे शाळेच्या आवारात कोणीही प्रवेश करत असतो. यातून जालना जिल्ह्यातील गोंदी येथील शाळेत जादूटोण्यासारखा प्रकार कोणीतरी केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळं गावात एकच चर्चा रंगत असून विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आहे. 

जालना जिल्ह्यातील गोंदी येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्गात हा प्रकार शनिवारच्या दिवशी समोर आला आहे. एका वर्गात बांगड्या, वाहिलेले हळद कुंकू आणि बाहुली आढळून आली आहे. हा धक्कादायक प्रकार पाहून नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वर्गातून पळ काढला. तर या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सीसीटीव्हीही गेले चोरीला 

दरम्यान गोंदी येथील जिल्हा परिषद शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे देखील काही दिवसापूर्वीच चोरी गेल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी शालेय व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी जालन्यातील गोंदी पोलिसांना निवेदन दिले आहे. मात्र या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. यातच शाळेच्या वर्ग खोलीत जादूटोण्यासारखा प्रकार समोर आला आहे. जादूटोण्यासारखे कृत्य केल्याची घटना समोर आली आहे.   

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT