Jalna Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Jalna Crime News: धक्कादायक! चाकूचा धाक दाखवून कापूस वेचणाऱ्या महिलेवर अत्याचार, आरोपी वकिलाचा शोध सुरु

Jalna Breaking News : आरोपीने पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देत दोन वेळा बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jalna Latest News : शेतामध्ये कापूस वेचणाऱ्या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना (Jalna) जिल्ह्यातल्या परतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आरोपीने पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देत दोन वेळा बलात्कार केला. या घटनेप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी वकिलाविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे. या घटनेमुळे जालन्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परतूर पोलिस (Partur Police) ठाण्याच्या हद्दीतील शेतामध्ये ही घटना घडली. 26 वर्षीय महिला आपल्या शेतामध्ये एकटीच कापूस वेचत होती. महिलेला शेतामध्ये एकटी पाहून संशयित आरोपी वकील दासू आढे त्याठिकाणी आला. आरोपीने पीडित महिलेकडे पिण्यासाठी पाणी मागितले. महिलेने त्याला पाणी दिले आणि ती पुन्हा कापूस वेचण्याच्या कामाला लागली. त्यानंतर आरोपीने संधीचा फायदा घेत महिलेचा जबरदस्ती हात पकडला.

यावेळी पीडित महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण शेतामध्ये कोणीच नसल्यामुळे तिच्या मदतीला कोणीच येऊ शकले नाही. यावेळी संशयित आरोपीने महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला कापून टाकण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला. ऐवढ्यावर न थांबता याविषयी कोणाला सांगतले तर जीवे मारुन टाकेल अशी धमकी आरोपीने पीडित महिलेला दिली.

घाबरलेल्या पीडित महिलेने आपली बदनामी होईल या भीतीने कुणालाही या घटनेविषयी सांगितले नाही. याचाच फायदा घेत आरोपी १ एप्रिलला दुपारी पुन्हा शेतावर आला. आरोपीला पाहून महिला घाबरली. आरोपीने पुन्हा चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार केला. घाबरलेल्या महिलेने घरी आल्यानंतर तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आल्या कुटुंबियांना सांगितले. त्यानंतर महिलेने तात्काळ परतूर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पीडित महिलेने संशयित आरोपी वकील दासू आढेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी परतूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. परतूर पोलिस ठाण्याच्या पिंक मोबाईल पथकाचे उपनिरीक्षक श्री कदम अया प्रकरणाचा तपास करत आहेत.

Edited By - Priya Vijay More

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या मनपुर वर्तुळात वनपालाचा होरपळून मृत्यू

तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा; पक्षाला मोठं खिंडार

Lucky Signs on Feet Soles: हाताप्रमाणे पायावरही असते भाग्य रेषा; 'हे' चिन्ह असेल तर नशीबात आहे राजयोग

जळगावमध्ये मोठा राडा! भाजप नेत्याला पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT