Jalna Police Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : जालना पोलीस प्रशासनात खळबळ; अवैध धंदा सुरु ठेवण्यासाठी २५ हजाराची लाच, फौजदारासह पोलिस शिपाई ताब्यात

Jalna News : जालना तालुका पोलीस ठाण्यातील फौजदार परशुराम पवार व पोलीस शिपाई लक्ष्मण शिंदे असे लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. या कारवाईमुळे जालना पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: शहरात सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्याचे काम पोलीस प्रशासनाचे आहे. मात्र अनेकदा काही पोलीस कर्मचारी हप्ते घेत हे अवैध धंद्यांवर कारवाई करत नाहीत. असाच काहीसा प्रकार जालन्यामध्ये समोर आला असून शहरात सुरु असलेला अवैध मटक्याचा धंदा सुरळीत सुरु ठेण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. हि रक्कम स्वीकारताना फौजदारासह पोलीस शिपाईला एसीबीने ताब्यात घेतले आहे. 

जालना तालुका पोलीस ठाण्यातील फौजदार परशुराम पवार व पोलीस शिपाई लक्ष्मण शिंदे असे लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. या कारवाईमुळे जालना पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. जालना शहर तसेच परिसरात अवैध धंदे जोरदार सुरू आहेत. अशाच प्रकारे शहरातील तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीचा मटक्याचा धंदा सुरू होता. हा अवैध व्यवसाय विनाअडथळा सुरू राहावा; यासाठी पवार आणि शिंदे यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती.

एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले 

दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांकडून २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याने तक्रारदाराने नंदुरबार लाचलुचपत विभागाकडे थेट तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी करून रात्रीच्या सुमारास एसीबीच्या पथकाकडून परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी संबंधित तक्रारदाराकडून फौजदारास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. यात पोलीस शिपायाचा देखील सहभाग असल्याचे समोर आले. 

दोघांवर गुन्हा दाखल 

जालना येथे मटक्याचा अवैध धंदा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना फौजदार परशुराम पवार आणि पोलीस शिपाई लक्ष्मण शिंदे यांना नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या कारवाईमुळे जालना पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT