Ambad News Saam tv
महाराष्ट्र

Ambad News : फिट्स येताच जमिनीवर कोसळला; हॉस्टेलमध्ये तरुणाचा मृत्यू, वडिलांकडून गंभीर आरोप

Jalna News : जालना जिल्ह्यातील अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास असलेल्या कन्हैया गहुले असे मृत तरुणाचे नाव आहे. सदरची घटना आज सकाळीच घडली

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: महाविद्यालयातील होस्टेलवर राहणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील अंबड येथे घडली आहे. या तरुणाला फिट्स आल्याने तो जमिनीवर कोसळला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे तंत्रनिकेतन विद्यालयात खळबळ उडाली आहे. 

जालना जिल्ह्यातील अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास असलेल्या कन्हैया गहुले (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. सदरची घटना आज सकाळीच घडली आहे. कन्हैया गहुले हा पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. महाविद्यालयात हॉस्टेल असल्याने तो येथेच वास्तव्याला होता. 

वडिलांकडून हॉस्टेल प्रशासनावर आरोप 

कन्हैया गहुले याला सकाळी फिट्स आले होते. हा प्रकार येथे असलेल्या काही जणांच्या लक्षात आले. यानंतर त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यासाठी नेण्यात येत होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मात्र मृत झालेल्या तरुणाच्या वडिलांनी या प्रकरणी कॉलेज प्रशासन आणि हॉस्टेलच्या रेक्टरवर हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

अहवाल येणे बाकी 

दरम्यान कन्हैय्या गहुले याला फिट्स आल्याने रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा अहवाल आल्यानंतर तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला; हे कारण समोर येणार आहे. अद्याप सदरचा अहवाल देखील प्राप्त झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही या ५ गोष्टी करू नका; अन्यथा...

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट्र '

पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून वाद टोकाला गेला; ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT