Jalna Corporation Saam tv
महाराष्ट्र

Jalna Corporation : अवैध नळ कनेक्शन धारकांना १० हजाराचा दंड; महापालिका प्रशासनाचा निर्णय, वसुली मोहिमेला सुरवात

Jalna News : अनधिकृतपणे कनेक्शन घेऊन पाण्याचा वापर अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी आणि त्यांना नियमित करण्यासाठी खासगी एजन्सी नेमली असून एजन्सी आजपासून आपले काम सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे.

संजय जाधव

अक्षय शिंदे 
जालना
: विधानसभा निवडणुकीची धामधूम संपताच जालना शहर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. मालमत्ता करासह नळपट्टी वसुलीची मोहीम देखील हाती घेतली. जालना शहरात अवैधरित्या असलेल्या नळ कनेक्शन धारकांचा शोध घेऊन त्यांच्याकडून दोन वर्षाचा पाणी कर, चालू वर्षाचा पाणी कर याबरोबरच विविध शुल्कासह एकूण १० हजार रुपयांचा दंड आकारला जाणार असून या मोहिमेला आजपासून सुरुवात होणार आहे. 

जालना शहर महापालिकेत नाळ कनेक्शन घेणार्यांना पाणी पट्टी आकारणी केली जात असते. तर काहीजण अनधिकृतपणे कनेक्शन घेऊन पाण्याचा वापर करत असतात. अशा अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी आणि त्यांना नियमित करण्यासाठी खासगी एजन्सी नेमली असून एजन्सी आजपासून आपले काम सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार ही एजन्सी शहरात अनाधिकृत नळ कनेक्शन शोधून संबंधितांना दंड आकारणार आहे. दंडाची रक्कम भरून अनधिकृत नळ कनेक्शन नियमित केले जाणार असल्याची देखील माहिती आहे.

शहरात २० हजारांहून अधिक अनधिकृत कनेक्शन  

जालना शहरात जवळपास ६५ हजार मालमत्ता आहे. त्यापैकी २० हजारांवर नळ कनेक्शन अनधिकृत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असतानाच अनाधिकृत नळ धारकांमुळे अधिकृत नळ धारकांना पाणी मिळत नसल्याने ते सुद्धा नळपट्टी भरण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे महानगरपालिकेने अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे.   

दहा हजाराचा करणार दंड
जालना महानगरपालिकेने अनधिकृत नळ कनेक्शन शोधून त्यांच्याकडून दोन वर्षाचा पाणीकर ५ हजार ४०० रुपये, तर चालू वर्षाचा पाणी कर २ हजार ७०० रुपये, दुरुस्ती शुल्क एक हजार रुपये आणि ठेकेदाराचे शुल्क ९०० रुपये असे एकूण दहा हजार रुपये अनाधिकृत नळ कनेक्शन धारकांकडून वसूल केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पक्ष बदलणाऱ्यांना बसणार दणका; 'आयाराम गयाराम नेत्यांना होणार शिक्षा, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Blood cancer symptoms: शरीरात हे बदल दिसले तर असू शकतो रक्ताचा कॅन्सर; लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

Petrol Disel Rate: पेट्रोल ७ रुपये तर डिझेल २५ रुपयांनी महागलं; या कंपनीने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

Madhuri Dixit: धकधक गर्लचा जलवा; माधुरी दीक्षितने नेसली 1,65,200 रुपयांची साडी

SCROLL FOR NEXT