Jalna : मंठ्यात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

Jalna : मंठ्यात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

मंठा तालुक्यात अतिवृष्टीने सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असुन शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आली.

लक्ष्मण सोळुंके

जालना : मंठा तालुक्यात अतिवृष्टीने सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असुन शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना द्यावी; यासाठी तालुक्यातील शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती राजेश मोरे यांनी आज दि.१ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील काही गावांच्या सरपंचासह शेकडो शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.

हे देखील पहा :

मंठा तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेती सह पीकांचे, विहिरींचे, जनावरांचे नुकसान झाले असून किर्तापुर येथिल रुस्तुम मस्के हा शेतकरी पुराच्या पाण्यात वाहुन जावून मरण पावला. हेलस येथील एक शेतकरी वीज पडुन मृत्युमुखी पडला. काही शेतकऱ्यांची जनावरे दगावली या शिवाय तालुक्यातील पाझर तलाव फुटुन शेतकऱ्यांचे नुकसान झाले, रस्त्यावरील पुल वाहुन गेले, तरी देखील आघाडी सरकारचे डोळे उघडत नाहीत आणि नुकसान भरपाई साठी मौन सुटत नाही. त्यामुळे आघाडी सरकारचा निषेध करत राज्य सरकारच्या विरोधात घोषणबाजी करण्यात आली.

दरम्यान, चार तास शेतकरी धरणे आंदोलनासाठी बसले होते. परंतु या वेळी तहसीलचा कोणताच अधिकारी किंवा कर्मचारी आंदोलकांची दखल घेत नसल्याने आंदोलकांनी उग्र रूप धारण केले. यावेळी उप सभापती राजेश मोरे सह चार ते पाच शेतकऱ्यांनी अंगावर डिझेल ओतुन घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मंठा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. यावेळी मंठा तहसीलचे नायब तहसीलदार शिंदे, पेशकार प्रल्हाद दवणे व पोलिस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला व आंदोलकांचे निवेदन घेऊन आंदोलन सोडण्यात आले. या निवेदनावर राजेश मोरे यांच्या सह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मंठा तहसिलदार सुमन मोरे यांच्याशी संपर्क केला असता घरी पितृ पुजा असल्यामूळे सुट्टीवर असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT