Jalna , PFI Jalna President , Arrest
Jalna , PFI Jalna President , Arrest Saam Tv
महाराष्ट्र

PFI : 'गाे बॅक एनआयए' दिल्या घाेषणा; पीएफआयच्या जिल्हाध्यक्ष्याला अटक, चार दिवस पाेलीस काेठडीत

लक्ष्मण सोळुंके

PFI Organisation: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या जालना जिल्हाध्यक्षला एटीएसच्या पथकानं अटक केली. त्याला न्यायालयात हजर केला असता चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

जालना शहरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षला काल पुन्हा एटीएसच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली. शेख उमेर शेख हबीब असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे. (Jalna Latest Marathi News)

तो पाप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला औरंगाबाद येथील न्यायालयात हजर केले असता त्याची चार दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. एटीएसच्या पथकाच्या रडारवर आणखी काही कार्यकर्ते असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. (Maharashtra News)

गेल्या महिन्यात एनआयए आणि दहशतवादी पथकांनी देशभरात पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी करत टेरर फंडिंगप्रकरणी जवळपास २१ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. जालना शहरातील रहिवाशी असलेल्या अब्दुल हादी अब्दुल रौफ याला एनआयएच्या पथकाकडून जळगाव शहरातील एका परिसरातून अटक करण्यात आल्यानंतर शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

त्यानंतर अब्दुल हादी अब्दुल रौफ याला चौकशीसाठी जालना शहरातील रहिमान गंज भागात असलेल्या त्याची घरी आणण्यात आले होते. पथकाकडून या परिसरातील त्याच्या घराची झाडाझडती घेत कसून चौकशी केली होती. दरम्यान त्याच्या लॅपटॉपसह महत्वाची कागदपत्र ही पोलिसांनी हस्तगत केल्या असल्याची माहिती समोर आली होती.

या चौकशी दरम्यान पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या जिल्हाअध्यक्ष शेख उमेर शेख हबीब सह कार्यकर्त्यांनी पथकाचा विरोध दर्शवत जोरदार घोषणजी करत एनआयए गाे बॅक च्या जोरदार घोषणाही दिल्या होत्या. तेव्हा पासून शेख उमेर शेख हबीब यांच्यासह अनेक कार्यकर्ते एटीएसच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raashii Khanna : क्या खूब लगती है, बडी सुंदर दिखती हो...

Today's Marathi News Live : रवींद्र वायकर यांच्यासाठी महायुतीचे उद्या मुंबईत शक्तिप्रदर्शन

SRH vs RR, IPL 2024: हैदराबाद- राजस्थानमध्ये कोण मारणार बाजी? कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

Parbhani News : विहिरीचे खोदकाम जेसीबीने; रोहयोच्या संतप्त मजुरांनी पंचायत समितीतच प्राशन केले किटक नाशक

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ, अटकेसाठी ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

SCROLL FOR NEXT