Jalna Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalna Cyber Crime : लग्नाचे आमिष; साहित्य खरेदी करण्याच्या नावाने ऑनलाईन फसवणूक

Jalna News लग्नाचे आमिष; साहित्य खरेदी करण्याच्या नावाने ऑनलाईन फसवणूक

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : आपलं लग्न व्हावं अस कुणाला नाही वाटतं. मात्र ह्याच लग्नाचं आमिष दाखून तुमची कुणी (Cyber Crime) फसवणूक केली तर. असाच काहीसा प्रकार (Jalna) जालन्यात घडला आहे. लग्नाचे आमिष देऊन लग्नासाठी साहित्य खरेदीच्या नावाने १ लाख ७१ हजार ९९८ रुपयात फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Tajya Batmya)

जालन्यातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीची ऑनलाईन अमनप्रितसिंग नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. त्यांच्या ऑनलाईन चॅटिंगच्या माध्यमातून गप्पाही झाल्या. याचं गप्पा दरम्यान २१ वर्षीय तरुणी अविवाहित असल्याचे लक्षात येताच अमनप्रितसिंगने त्याला तुझ्या लग्नाचं मी बघतो, म्हणत मुली ही दाखवल्या. या तरुणीने ऑनलाईज मुलगही पसंद केली. विवाह करण्याच निश्चित करत तारीख ही ठरली. मात्र त्यानंतर लग्नासाठी लागणारे साहित्य आणि दागिने खरेदी करण्यासाठी आणि ते कुरिअरद्वारे सोडविण्याकरिता अमनप्रितसिंग या तरुणीकडे वेळोवेळी ऑनलाईन पैशांची मागणी केली. 

लग्नाच्या आशेने पैसे केले ट्रान्सफर 

लग्न (Marriage) होणार या आशेने या तरुणीने १६ ते २० जुलैच्या दरम्यान अमनप्रित सिंगच्या नावे तब्बल १ लाख ७१ हजार ९९८ रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. मात्र त्यानंतर अमनप्रित सिंग यांचा संपर्क होऊ न लागल्याने बिथरलेल्या तरुणीची ही बाब आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना सांगितली. मित्रानी त्याला घेऊन सायबर पोलिस ठाणे गाठत सर्व हकीगत सांगितली असता सायबर पोलिसांनी या प्रकरणी नशीन महोमद करीम शेख  या तरुणीची ऑनलाईन फसवणूक झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. अधिक तपास सायबर पोलिस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गॅस सिलिंडरसाठी जास्त पैसे घेतले तर खबरदार! थेट गुन्हा दाखल होणार

Maharashtra Live News Update : गॅस सिलिंडर टंचाई प्रकरणी काँग्रेसचं आंदोलन; शिवसेना आमदार गोगावलेंची टीका

Kuldeep Yadav Wedding: कुलदीप यादवची होणारी बायको कोण? मेहेंदीचे फोटोचे झाले व्हायरल

Hair Care Tips: महिलांनो पार्लरला जाण्याची गरज नाही, घरीच करा केरीटीन ट्रिटमेंट; वाचतील हजारों रुपये

कुणाला किती मिळणार गॅस सिलिंडर? टंचाई होणार दूर,वितरणासाठी राज्य सरकारचा नवा प्लॅन

SCROLL FOR NEXT