Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime News: ध्वजारोहण होताच अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला जाळलं; गावकऱ्याचं टोकाचं पाऊल, धक्कादायक कारण आलं समोर

Crime News: कुठलीच कारवाई होत नसल्याने १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा या व्यक्तीने दिला होता.

साम टिव्ही ब्युरो

लक्षमण सोळुंके

Jalna News: स्वातंत्र्य दिनी जालना येथे एका व्यक्तीने दारू बंदीच्या मुद्द्यावरुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये हा व्यक्ती ५० टक्के भाजलाय. सध्या त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दारूबंदीसाठी त्याने टोकाचं पाऊल उचलल्याने गावकऱ्यांमध्ये खळबळ उडालीये. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा गावात अवैधरीत्या दारू विक्री सुरू आहे. ती बंद करावी म्हणून वारंवार ग्रामपंचायत आणि दारूबंदी विभागाला तक्रार केली जात होती. मात्र कुठलीच कारवाई होत नसल्याने १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा या व्यक्तीने दिला होता.

वसंत प्रभाकर नागारे असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. वसंत यांनी आज ध्वजारोहाणानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतले आणि स्वतःला पेटून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यात वसंत नागरी हे 50% जळाले असून त्यांना उपचारासाठी पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. वारंवार सरपंच आणि दारूबंदी विभाग विभागाला तक्रार करूनही कुठलीच कारवाई केली जात नसल्यामुळे आपण दारूबंदीसाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असल्याचं प्रभाकर नागरे यांनी म्हटलंय. दारूबंदी विभागाविरोधात केलेल्या या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यात एकच खलबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT