Jalna Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime : मुलीच्या छेडखानीला विरोध करणाऱ्या पित्याला बेदम मारहाण; जालन्यातील धक्कादायक घटना

Jalna News : जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मधील ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रिसिडेन्सीमध्ये काल ही घटना घडली

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: रस्त्यांवर चालणाऱ्या मुली- महिलांच्या छेडखानीच्या घटना वाढत असताना रोडरोमिओंची दादागिरी देखील वाढल्याचे पाहण्यास मिळत आहे. कारण जालन्यामध्ये अधिक एक धक्कादायक घटना घडली असून मुलीच्या होत असलेल्या छेडखानीला विरोध केला म्हणून मुलीच्याच वडिलांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. 

जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मधील ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रिसिडेन्सीमध्ये काल ही घटना घडली असून याप्रकरणी जालन्यातील चंदनझीरा पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीसह ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक देखील केली आहे.

छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला मारहाण
जालना शहराजवळील यमुना रेसिडेन्सी येथे मुलीची छेडछाड करण्यात येत होती. या छेडछाडीला विरोध करण्यासाठी मुलीचे वडील तेथे गेले. यावेळी समोरच्यांनी मुलीच्या पित्यालाच लाठ्याकाठ्यानी मारहाण करण्यास सुरवात करण्यात आली. यावेळी परिसरातील काही जणांनी मारहाण थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन- तीन जणांकडून त्या पित्याला अमानुषपणे मारहाण करणे सुरूच ठेवले. जीव वाचविण्यासाठी सदर व्यक्ती एका घरात गेल्याचे दिसून येत आहे. 

दोन संशयित आरोपींना अटक
घडलेल्या प्रकारात सदर इसम जखमी झाला असून मारहाण केल्याप्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी लागलीच तपास करत याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास चंदनझिरा पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ८ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

SCROLL FOR NEXT