Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : बैल चोरी करताना सापडला; शेतकऱ्यांनी चोप देत केले पोलिसांच्या स्वाधीन

Jalna News : जालना तालुक्यातील रामनगर, बाजी उम्रज, घोडेगाव परिसरात गेल्या एक वर्षापासून मुक्या जनावराच्या चोरीचा प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना जिल्ह्यातील परिसरात मागील काही दिवसांपासून जनावरे चोरीला जात असल्याच्या (Jalna) घटना घडल्या होत्या. यामुळे शेतकरी, पशुपालक मागावर होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास घोडेगाव परिसरात बैलाची चोरी करताना एक चोरटा (Farmer) शेतकऱ्याच्या नजरेस पडला असता, त्याला पकडून शेतकऱ्यानी चांगलाच चोप दिला. (Maharashtra News)

जालना तालुक्यातील रामनगर, बाजी उम्रज, घोडेगाव परिसरात गेल्या एक वर्षापासून मुक्या जनावराच्या चोरीचा प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. यामुळे शेतकऱ्यांनी ठरवून घेत आखाड्यावर रात्रभर जागे राहण्याची वेळ आली होती. रात्री जागरण करत शेतकरी चोरट्यांच्या मागावर होते. मात्र चोरटे शेतकऱ्यांच्या नजरेस पडत नव्हते. दरम्यान याचं परिसरात (Crime News) रात्री शेतकरी आखाड्यावर असताना बैल चोरीचा प्रयत्न करतांना एक चोर शेतकऱ्यांना आढळून आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाठलाग करत पकडले 

बैल चोरी करताना चोरटा आढळून आल्याने शेतकऱ्यांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरवात केली. काही अंतरापर्यंत पाठलाग करत या चोराला अखेर पकडण्यात आले. यानंतर चोराला चांगलाच चोप देत साखळदंडाने झाडाला बांधून ठेवले. घटनेची माहिती मौजपुरी (Police) पोलिसांना दिली. पोलिसांनी या चोराला तब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत या प्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन राज ठाकरेंचा माज उतरवणार'; बिहारचे खासदार पप्पू यादवची मुजोरी

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

SCROLL FOR NEXT