Crime News Saam TV
महाराष्ट्र

Jalna Crime News : खळबळजनक! नाचता नाचता वाद विकोपाला; रामनवमी यात्रेत तरुणाची हत्या

३० वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Crime News : जालना येथून एक दुखःद घटना समोर आली आहे. काल रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. नाचण्याच्या कारणावरून दोन व्यक्तींमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर झालेल्या वादातून ३० वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. (Jalna)

सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बडी सडक परिसरात ही घटना घडल्याने शहरात एकच खबळ उडाली आहे. विष्णू राम सुपारकर असं मृत तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. काल (गुरुवार) जालना शहरात श्रीराम जन्म उत्सावानिमित्त मोठ्या उत्साहात शोभा यात्रा काढण्यात आली.

या शोभा यात्रेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर यांच्यासह शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. दरम्यान बडी सडक परिसरातून ही शोभा यात्रा जात असताना दोन तरुणांमध्ये नाचण्याच्या करणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हणामारीत झाले. यात एका तरुणावर धारदार चाकूने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

विष्णू राम सुपारकर या ३० वर्षीय तरुणाचा दुर्दवी मृत्यू झालाय. या घटनेनंतर शहरातील नागरिकांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात एकच गर्दी करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच पोलीस स्टेशनला घेरावा घातला. यामुळे पोलिस्टेशन आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या प्रकरणी सदर बाजर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांच्या पथकाकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'शाळांची स्थिती सुधारा, सुविधा द्या! CJP च्या पोलखोलनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री भुसेंची क्लास

कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर, राजकारणात खळबळ

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा होणार कायापालट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आखला रोडमॅप

काँग्रेसला जोरदार धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

CJPचं 'स्कूल ठीक करो' अभियान वादात, लातूरमध्ये दिपकेंसह 5 जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT