Jalna Crime News saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime News: शेतात सोन्याने भरलेले सात हंडे! कुंकू, लिंबू, नारळ सोन्यासाठी शेतात अघोरी पुजा; जालन्यातील धक्कादायक प्रकार

Aghori ritual in Jalna: जालना जिल्ह्यातील टकले पोखरी गावात शेतात सात सोन्याचे हंडे असल्याच्या संशयातून अघोरी पूजा करण्यात आली. या प्रकरणी परतूर पोलिसांनी शेतमालकासह नऊ जणांना ताब्यात घेतले असून जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

अक्षय शिंदे पाटील, प्रतिनिधी

जालना जिल्ह्यात सोन्याने भरलेले सात हंडे असल्याचा संशय व्यक्त करत ते शोधण्यासाठी शेतात अघोरी पूजा केल्याचा प्रकार समोर आलाय. टकले पोखरी गावातील शेतशिवारात हा प्रकार घडला. याप्रकरणी परतूर पोलिसांनी शेतमालकासह नऊ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 11 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

टकले पोखरीमधील शिवलाल धोंडीराम राठोड यांनी आपल्या शेतात सोन्याने भरलेले सात हंडे असल्याचा संशय व्यक्त केला होता. हे हंडे शोधण्यासाठी त्यांनी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील काही लोकांना शेतात बोलावलं होतं. त्यानंतर हे सर्वजण शेतात अघोरी पूजा करण्यासाठी आले होते.

पोलिसांना मिळाली गुप्त माहिती

दरम्यान रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन उपस्थित लोकांची विचारपूस केली आणि झाडाझडती घेतली. यावेळी पूजेसाठी आणलेले लिंबू, नारळ, सुपारी, बदाम आणि कुंकू असे साहित्य पोलिसांनी जप्त केले. या तपासणीनंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतमालकासह नऊ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास परतूर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये बेकायदेशीर कोळसा डेपोविरोधात नागरिक आक्रमक

भीषण अपघात! ट्रक आणि मिनीबसची जोरदार धडक; १६ जणांचा मृत्यू

Weather Update: पुन्हा चक्रीवादळाचे संकट! 19-20 नोव्हेंबरला वादळ धडकणार; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट

Winter Beauty Tips : थंडीत चेहरा काळवंडतोय? त्वचेचा नैसर्गिक सुंदरता टिकवण्यासाठी करा या गोष्टी

Fake Milk: डिटर्जेंट आहे की दूध; दुधाची शुद्धता कसं ओळखाल?

SCROLL FOR NEXT